Thursday, 22 January 2015

हिंदुहृदयसम्राट...जय महाराष्ट्र!


बाळासाहेब ! जय महाराष्ट !!!


अस्तित्वासाठी केलेली लढाई अथवा संघर्ष म्हणजे "राजकारण" होवू शकत नाही, मग तो संघर्ष किंवा ती लढाई समाजाच्या,राष्ट्राच्या वा धर्माच्या अस्तिवाची किंवा रक्षणाची का असेना!


(तुलना-बिलना नाही)
जसे रामांनी-क्रुष्णांनी धर्मरक्षणासाठी त्या-त्या काळात संघर्ष केला, श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी अधर्मा शी संघर्ष केला,तसाच (परिस्थिती,काळ,प्रसंग,स्वरुप आणि माध्यम फक्त निराळे) संघर्ष केला,रक्षण केले,आधार दिला तो बाळासाहेबांनी. राजा म्हणून नाही,सेनापती बनुन.


कुरुक्षेत्रावर अर्जुन विजयामागचे कारण जसे "क्रुष्ण" होते, तशीच शिवसैनिकाला दिलेल्या "आदेशा"मागची क्रुष्णाची भुमिका साहेबांची असायची.

जाणता सेनापतीच तो!


लोखंडाचं सोनं करणारा परीस आपण ऐकलाय,पाहिला नाही.पण सानिध्यात आलेल्या सामान्यास असामान्य पदापर्यंत पोहोचवून त्याच्या आयुष्याचे सोनं करणारे "साहेब" म्हणजे परिसच नाही का?


साहेबांच हिंदुत्व!
एकदा बेगडे निधर्मी व न्यायालयाने साहेबांच्या हिंदुत्वावर आक्षेप घेतला,त्यावेळी साहेबांनी हिंदुत्वाची व्याख्या सांगितली:-

"जो या हिंदूस्थानात राहतो,खातो व देशावर प्रेम करतो, अभिमान बाळगतो व देशहित पाहातो तो हिंदुच. अमेरिकेत अमेरिकन, पाकिस्तानात पाकिस्तानी, चिन मध्ये चीनी तसे हिंदुस्थानात जे राहतात ते हिंदू, अशी साधी,सरळ,सोपी व्याख्या बाळासाहेबांनी मांडली होती.

 जाणता सेनापती!
शिवसेना हा जरी राजकीय पक्ष असला तरी त्याची बांधणी हि संघटनात्मक आहे, सत्ता असेल तर सरकारमधून वा नसेल तर रस्त्यावरुन आपन समाजकारण करु! हे बाळासाहेबांचे धोरण.

शिवाजी महाराजांना आदर्श ठेवून व त्यांचेच नाव देवून, त्याँच्याच संघटनात्मक प्रणाली प्रमाणे "अष्टप्रधानमंडळ" बनविले.

साहेबांवर एकाधिकारशाही,हुकुमशहा अशी टिका झाली,तेव्हा ते म्हणाले "मी फालतू,गुळमुळित लोकशाही मानत नाही तर रोखठोक ठोकशाही मानतो. ज्यांच्या आदेशाने लाखो युवक-लोक जीवाची बाजी लावून  काहीहि करण्यास तयार होत.निष्ठेशिवाय हे कधीही पाहायला मिळत नाही.

 वक्ता दससहश्रेषू!
तुफानी शब्दफेक, ऐकत सांगणारा वक्ता, आपल्याला जे बोलायचय ते निर्भिडपणे, फिकिर न ठेवता बोलणारच,

ज्याच्यावर साहेबांनी टिका केली तो सुप्रसिद्ध-कुप्रसिद्ध झाल्याशिवाय राहात नसे, मर्मविनोदी शैली, कुठलाही विषय नेमक्या पण कमी शब्दात सांगण्याची हातोटी, कुणावरही निडर कुठेही शाब्दिक वार करण्याची धमक, काहिसा वीर रसाचा वापर, बोललेल्या शब्दाबद्दल ठाम राहणे यामुळे त्यांची प्रत्येक सभा हि गर्दिचा उच्चांक करायची.

 पट्टीचा व्यंगचित्रकार!
साहेब जसे भाषणातून एखाद्यावर बरसत तसेच ते व्यंगचित्रातून एखाद्याल घायाळ करत्.

अफाट-अचाट साहेब.
साहेब जेव्हा अगदी शेवटी आजारी होते तेव्हा त्यांना भेटायला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आल्या होत्या तेव्हा बाळासाहेबांनी त्यांच्याकडे एका दहशतवाद्याच्या(अफझल गुरु) फाशीची मागणी केली होती.
आयुष्याच्या शेवटच्या घटकांमध्येही ज्या माणसाला देशाच्या प्रश्नाची चिंता होती.
अशा अजातशत्रूच्या देहाच्या अंतयात्रेला वीस लाख लोक आले त्यात नवल ते काय?
साहेब! तुम्ही गेला नाहीत, तुम्ही,तुमचे सोन्याचे विचार आणि विचाराचं सोनं यांसोबत आपली जयंती साजरी करू!
सागर हारपुडे
जय महाराष्ट्र!